जबऱ्या इंद्रियमोहासाठी पुरुषसंतांनीही ‘नवरा’ हेच प्रतीक मानून स्वतःकडे स्वैरिणीची भूमिका का घ्यावी?
प्रपंचातून मुक्ती मिळवणे हे सर्वच संतांचे ध्येय होते. त्यासाठी प्रपंच-मोहातून मोकळे होणे, निःसंग होणे, फकिरी स्वीकारणे आणि लौकिक भयातून मुक्त होणे, निर्द्वंद्व होणे हे उद्दिष्ट होते. स्त्रियांचेही तेच उद्दिष्ट होते. परंतु लौकिक-भौतिक जीवनातले अडथळे आणि ओढाळ इंद्रियमोह जबरे बंधक आहेत याचे भान त्यांना होते. या जबऱ्या इंद्रियमोहासाठी पुरुषसंतांनीही ‘नवरा’ हेच प्रतीक मानून स्वतःकडे स्वैरिणीची भूमिका का घ्यावी?.......